Hanuman Sena News

कोणाची विकेट कधी घ्यायची हे मला चांगले ठाऊक... अब्दुल सत्तार



औरंगाबाद: चंद्रकांतकांत खैरे चांदीची गदा घेऊन फिरत आहेत. याचा अर्थ जर मला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी माध्यमांत माझ्या राजीनाम्याची ब्रेकींग न्यूज येईल. त्यानंतर मैदानात त्यांनी यावे. कोण गदा घेऊन येतो, कशा पद्धतीने येतो, त्याला आमची ढाल-तलवार कशा पद्धतीने लढा देईल हे सर्वांना दिसेल असे वक्तव्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते माध्यमांना आज बोलत होते.सत्तार म्हणाले, नो ड्रग्ज मोहीमेद्वारे आयोजित क्रिकेट स्पर्धेत इम्तियाज जलील यांची विकेट मी घेतली. परंतु त्यांच्याच माध्यमातून मी (चंद्रकांत खैरे) एक विकेट घेतली होती. आता ती विकेट पडलेली आहे. ते आता काॅंव काॅंव करीत आहेत.सत्तार म्हणाले, इम्तियाज जलील यांची दांडी गुल झाली..दांडी गुल करणे सोपी गोष्ट नाही. पण जे जे पुढे बॅटींगला येतील त्यांनी ध्यानात ठेवावे. कुणाची विकेट कधी घ्यायचा, कशा परिस्थिती घ्यायचा हे मला चांगले ठावूक आहे. माझा रिमोट कंट्रोल घ्यायचा सांगितला त्याचा विकेट मी घ्यायला बसलो.सत्तार म्हणाले, चंद्रकांत खैरेंनी माझ्याविरोधात लढावे. सिल्लोडचे एकच मैदान खाली आहे. त्यामुळे कोण विजयी होईल हे समजेलच आणि वरळीची लढाई होत असेल तर ती लढायलाही मी तयार आहे.सत्तार म्हणाले, गदा हनुमानाचा आहे, तो पेलण्यासाठी शक्ती लागते. विरोधकांकडे शक्ती नाही. मी एकनाथ शिंदेंचा भक्त आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरेंचा आणि माझा एकदा मुकाबला कराच. माझ्याकडे पद आहे, मी कृषिमंत्री आहे. आमदारकीचा राजीनामा दिला तर त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनीही माझ्याविरोधात लढावे.सत्तार म्हणाले, आमच्याकडे निशाणी जी आहे ती छत्रपती शिवरायांची तलवार आणि ढाल आहे. आमच्याविरोधात कुणी आले तर शिंदे सरकार आणि मी तयार आहे असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post