मुंबई - अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येथे चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. अखेर निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलेली विनंती, शरद पवारांचे आवाहन आणि प्रताप सरनाईक यांचे पत्र, यानंतर भाजप नेत्यांमध्ये तातडीच्या बैठका झाल्या आणि अखेर शिवसेना उमेदवार ऋुतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे, आता अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार नसणार आहे.भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज परत घेत आहे. लटके या निवडून याव्या यासाठी अर्ज परत घेत आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'मेघदूत' बंगल्यावर रविवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीला आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मुरजी पटेल उपस्थित होते. मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. आपली पूर्ण तयारी झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. तर आशिष शेलार यांचाही पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह होता. मात्र, अखेर सी. टी. राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे, आता, ऋुतुजा लटके यांचा विजय सोपा झाला आहे. आधी राज ठाकरेंचं पत्र, त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून पोट निवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी, अशी केलेली विनंती. तर, गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघाचा दाखला देत शरद पवार यांचेही भाजपाला पोटनिवडणूक न लढविण्याबाबत आव्हान करण्यात आले विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत शरद पवार यांनी अंधेरी पोट निवडणुकीबाबत पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत ते कौतुकास्पद आहेत त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपला आहे.
अंधेरी मध्ये शिवसेनेचा विजय सोपा अखेर भाजपाकडून उमेदवारी अर्ज मागे ...
Hanuman Sena News
0
Post a Comment