Hanuman Sena News

हिम्मत असेल तर तुम्ही मैदानात या माझी तयारी आहे... उद्धव ठाकरे


शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांना अनुक्रमे मशाल आणि ढाल-तलवार ही निवडणूक चिन्हे मिळाली आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गटातील या संघर्षावर थेट भाष्य केले. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागत आहे. मैदानात या. मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागत आहे दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावे म्हणून न्यायालयात जावे लागले हिम्मत असेल तर तुम्ही मैदानात या माझी तयारी आहे दोघे एकाच व्यासपीठावर एकाच मैदानावर येऊ मग जी लढाई व्हायची ती होऊ दे असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला शिवसेनेने अनेक वादळ अंगावर घेतली होती .मात्र शरद पवार काँग्रेस यांच्या रूपात वादळ निर्माण करणारी लोक सोबत असल्यामुळे मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहत आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले आपल्या भाषणात त्यांनी मिस्कल टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या रूपात सोबत राहावे असे आव्हान केले. भुजबळ यांची ही पहिलीच 75 वी आहे पुढच्या 75 वी लाही सोबतच राहा आम्हाला कार्यक्रमाला बोलवा असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच महाविकास आघाडी ची सत्ता ही तुमच्या हातात आहे. नेत्यांचा जयजयकार करून चालणार नाही कार्यकर्त्यांनाही सोबत घ्यावे लागेल महाविकास आघाडी सरकार तसेच उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावरही भाष्य केले नियतीच्या मनात काय असते हे कोणाला माहित नसते आता मर्दाच्या हातात मशाल देण्याची नितीची इच्छा आहे .प्रत्येकाचे वय वाढत असते म्हणून वयाने मोठा होत असतो पण तो जेव्हा विचारांनी थकतो तेव्हा तो खरा वृद्ध होतो .अडीच तीन वर्षांपूर्वी आपण एक नवे समीकरण जन्माला घातले महाविकास आघाडीच्या रूपात आपण हे समीकरण यशस्वीपणे चालवले होते. मात्र हे पाहून एखाद्याला पोटशूळ उठणे साहजिकच आहे. याच कारणामुळे आता सरकार पाडण्यात आले सरकार पाडण्यासाठी किती खालची पातळी गाठवण्यात आली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला.

Post a Comment

Previous Post Next Post