मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. धमकीचे मला काही अप्रूप नाही. कोणाला वाटलं तरी ते काहीही करू शकत नाहीत. त्यांनी अशाप्रकारचं धाडस करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.धमकी बाबत पोलिस आणि गृह विभागाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे नक्षलवाद्याकडून या आधीही धमक्यांचे फोन आले होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे दसरा मेळावा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुख्यमंत्र्यांना मिळालेली धमकी पोलीस यंत्रणे समोर मोठा आव्हान आहे शिंदे गडाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे चा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे स्पोर्ट घडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जिभे मारण्याचा कट असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे त्यानुसार पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे या धमकीनंतर शिंदेच्या ठाण्यातील आणि शासकीय निवासस्थान वर्षावरील सुरक्षित वाढ करण्यात आली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यालयात महिनाभरा आधी धमकीचे पत्र आले होते त्यानंतर धमकीचा फोन देखील आला होता पंढरपुरातील आषाढी वारीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी...
Hanuman Sena News
0
Post a Comment