Hanuman Sena News

श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला शिवराज पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य...

 

शिवराज पाटील यांच्याकडून गीतेची तुलना जिहादशी श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुरानात नाही तर येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या बायबल मध्येही आहे .असे त्यांनी म्हटले.श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलं आहे. दिल्लीमधील एका आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. यामुळे आता शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर टीका होत असून राजकीय वादाची शक्यता निर्माण झालीय. शिवराज पाटील यांनी गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे, अशा आशयाचं वक्तव्य शिवराज पाटील यांनी केलं आहे. शिवराज पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची चिन्ह आहेत.मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवराज पाटील यांनी बायबल आणि गीता यांची तुलना केली. पाटील म्हणाले की, महाभारत ग्रंथामध्ये सांगण्यात गीतेचा भाग समाविष्ट आहे. याच गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला जिहादच्या गोष्टी सांगत आहे.
"मनामध्ये कोणतीही किल्मिष नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुरणमध्ये नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे श्रीकृष्ण अर्जुनाला जो जीहाद सांगायचा तो केवळ फक्त कुरणात नाही तर येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या बायबल मध्ये आहे असे त्यांनी म्हटले आहे शिवराज पाटील आणि वाद हे समीकरण नवीन नाही याआधीही अनेकदा त्यांनी वाद उडवून घेतला आहे मुंबईमध्ये सर्वात मोठा दहशतवादी हल्ला सुरू होता तेव्हा गृहमंत्री असलेले शिवराज पाटील कपडे बदलल्यामुळे चर्चेत आले होते दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाची आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली होती इतक्या महत्त्वाच्या बैठकीला पाटील उशिराने पोहचले होते कारण ते सूट बदलण्यात व्यस्त होते दहशतवादी हल्ला झाला त्यादिवशी गृह मंत्रालयाच्या पाच बैठका झाल्या होत्या या सर्व बैठकांमध्ये पाटील वेगवेगळ्या पोशाखात उपस्थित होते.या सगळ्या गदारोळ्यानंतर त्यांच्याकडून यूपीआय सरकारनं गृहमंत्री पदाचा राजीनामा घेतला होता इतकेच नाही तर मुंबई प्रमाणे दिल्लीमधील सीलसिलेवार भागातही बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळी सगळ्या ठिकाणी एकच हल्लकल्लोळ माजला होता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते पण अशा वातावरणातही तत्कालन गृहमंत्री शिवराज पाटील यांचा सर्व लक्ष पोशाखावर होतं यावेळी दोन तासात त्यांनी तीन वेळा सूट बदलला होता.


Post a Comment

Previous Post Next Post