बुलढाणा (चिखली) : गेल्या दोन-तीन वर्षापासून सातत्याने परतीचा पाऊस शेतकऱ्यांचे नुकसान करतोय आता तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय यंदाही परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढलाय त्यामुळे सरकारी निकष बाजूला ठेवा मात्र कुठल्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवू नका अशा सूचना आमदार श्वेता ताईंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहेत काल आमदार श्वेता ताई चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पंचनामे करताना कोणताही भेदभाव करू नका शेतकऱ्यांच्या या प्रकरणांशी संबंधित कोणतेही तक्रारी यायला नको.असेही आमदार श्वेता ताई म्हणाल्या चिखली तालुक्यातील पेठ शेलसुर मोहदरी धोत्रा नाईक हिवरा नाईक आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर श्वेता ताई पोचल्या होत्या यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार अजितकुमार येळे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे भाजपा तालुका अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना घेऊन बांधावर! एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवू नका... आमदार श्वेताताई महाले
Hanuman Sena News
0
Post a Comment