Hanuman Sena News

बोगस वाहन नोंदणी प्रकरणात आणखी दोघांना अटक...


बुलढाणा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३४ वाहनांच्या बाेगस नाेंदणी घाेटाळ्यात बुलडाणा शहर पाेलिसांनी दि. १५ ऑक्टाेबर राेजी आणखी दाेघांना अटक केली आहे. या दाेन्ही आराेपींना न्यायालयाने दि. १७ ऑक्टाेबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. या प्रकरणात पाेलिसांनी आतापर्यंत १७ वाहने जप्त केली आहेत़
बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३४ वाहनांची बाेगसपणे नाेंदणी करण्यात आल्याचे समाेर आले हाेते. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले हाेते, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी बुलडाणा शहर पाेलिसांत तक्रार दिली हाेती. त्यावरून आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणाचा तपास एपीआय जयसिंग पाटील यांनी सुरू करून एका आराेपीस अटक केली हाेती, तसेच १७ वाहने जप्त केली आहेत. १५ ऑक्टाेबर राेजी पाेलिसांनी नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद येथील डिलर सुभाष पाटील आणि अर्शद खान यांना अटक केली आहे़ त्यांना न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ ऑक्टाेबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे़ पाेलिसांनी या प्रकरणात आणखी दाेन वाहने जप्त केली आहेत, त्यामुळे जप्त केलेल्या वाहनांची संख्या १७ वर पाेहोचली आहेत. यापैकी एक कार चाेरीची असल्याने ती मुंबई पाेलिसांच्या ताब्यात आहे़
आराेपींची संख्या वाढणार
या प्रकरणात पाेलिसांनी १९ पेक्षा जास्त वाहन मालकांचा शाेध लावून त्यांचे बयाण घेतले आहे, तसेच आरटीओ कार्यालयातील निलंबित कर्मचारी व इतरांचे जबाबही नाेंदवले आहे. काही वाहन मालकांवर पाेलिसांचा संशय असल्याने त्यांनाही अटक हाेण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या दाेन आराेपींच्या चाैकशीत आणखी खुलासे हाेणार आहेत, त्यामुळे या प्रकरणात आराेपींची संख्या वाढणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post