Hanuman Sena News

विघ्नहर्ता महिला गणेश उत्सव मंडळ, नांदुरा खुर्द कडुन सार्वजनिक भुलाबाई उत्सव हर्ष उल्हासात साजरा...


नांदुरा खुर्द:  गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौरी पूजन तसेच नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो. यादरम्यानच भुलाबाईंची स्थापना सुद्धा होत असते. काही मुली तर संपूर्ण एक महिना भुलाबाईची स्थापना करतात. भुलाबाईचे विसर्जन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी होते. मुली तसेच महिला सुद्धा या उत्सवात सहभागी होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये भुलाबाईंचाचा उत्साह पूर्वीसारखा दिसून येत नाही. भुलाबाईंची स्थापना करणे, त्यांची गाणे म्हणने व मोठ्या उत्साहात त्यांचे विसर्जन करणे ही आपली भारतीय हिंदु परंपरा आहे.भुलाबाईंची परंपरा आपण मोठ्या निष्ठेने जोपासायला हवी म्हणून नांदुरा खुर्द येथील विघ्नहर्ता महिला गणेश उत्सव मंडळातील महिलांनी तसेच मुलींनी पारंपरिकरित्या भुलाबाईंची स्थापना करून विसर्जन केले. विघ्नहर्ता महिला गणेश उत्सव मंडळातील सर्व सदस्यांनी सार्वजनिक भुलाबाईंची स्थापना केली. 
कोजागिरी पौर्णिमेलाच माळी पौर्णिमा सुद्धा म्हणतात म्हणूनच भुलाबाईंजवळ माळे ( काळ्या मातीचे दिवे ) लावतात, आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जपत या महिला मंडळातील महिला-मुलींनी काळ्या मातीचे माळे तसेच भुलाबाई देखील स्वतःच्या हाताने बनविल्या. भुलाबाईंच्या स्थापनेनंतर भुलाबाईंचे गाणे, पाळणा, आरती सोबतच प्रसादाचे वाटप करून भुलाबाईंचे विसर्जन करण्यात आले. विघ्नहर्ता महिला गणेश उत्सव मंडळातील महिला तसेच मुलींनी सार्वजनिकरित्या भुलाबाईंची स्थापना करून भारतीय परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.मंडळातील सर्व मुलींनी अश्याच प्रकारे इतरही उत्सव सार्वजनिकरित्या घेऊन आपली संस्कृती जपुन तिचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवण्याचा निश्चय केला आहे.यावेळी, सौ. सरिताताई प्रकाश बावस्कार,बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख, तथा अध्यक्षा विघ्नहर्ता महिला गणेश उत्सव मंडळ नांदुरा खुर्द, सौ प्रज्ञाताई तांदळे, बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख व मंडळातील इतर पदाधिकारी व सदस्यांसोबतच इतर महिला व बाल मुलींचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post