अर्चना ताई पाटील
विशेष प्रतिनिधी
नांदुरा (निमगाव ) :- भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंती पर्यंत भाजपाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमाच्या अंतर्गत नांदुरा तालुका जि.प निमगाव व अलमपुर सर्कल भाजपाच्या वतीने व माजी आमदार चेनसुखजी संचेती यांच्या प्रेरणेने जिल्हाध्यक्ष आकाश दादा फुंडकर यांच्या नेतृत्वात, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ सिंधुताई खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, बलदेवराव चोपडे व मा.जि.परिषद अध्यक्ष सौ. उमाताई तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच तालुका अध्यक्ष संतोष मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली, सेवा सप्ताह संयोजक शैलेश भाऊ मिरगे, यांच्या संकल्पनेतून श्री सुपो महाराज मंदिर संस्थान निमगाव येथे ३० सप्टेंबर रोजी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 200 रुग्णांनी श्री नेत्रालय खामगाव येथील डॉ.निलेश जवळकर, व डॉ.मुकेश नाये यांनी मोफत तपासणी करून गरजू रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप सुद्धा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार चेनसुखजी संचेती हे होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक शिवाजीराव पाटील यांनी केले. तसेच माजी आमदार चेनसुख संचेती, बलदेवराव चोपडे यांनी आपले विचार मांडले.
यावेळी मा. पशुधन विकास आयुक्त भास्करराव चरखे तसेच काँग्रेसचे युवा नेते निलेश देशमुख यांचा प्रवेश चेनसुख संचेती यांच्या हस्ते भाजपामध्ये करण्यात आला. यावेळी "जल ही जीवन" पत्रके वाटप करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन विधानसभा विस्तारक गणेश राव भोपळे यांनी केले. मा.आमदार संचेती भाजपा नांदुरा तालुका अध्यक्ष संतोष भाऊ मुंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ उमाताई तायडे, बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे, भाजपा युवा नेते प्रशांत वडोदे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर ,जिल्हा सरचिटणीस पवार ताई विमुक्त भटक्या जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष सदस्य शत्रुघ्न पाचपोर, जिल्हा सचिव प्रज्ञाताई लासुरकर, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष कैलास डांगे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रवीण मानकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अर्जनाताई पाटील,माजी सभा सभापती ज्योतीताई भोपळे, गजाननराव चरखे, विनोद बापू देशमुख, निमगाव दिनकर कुवारे, माजी उपसभापती संदीप गावंडे, सोपानराव चोपडे ,भानुदास बोरसे, विठ्ठल ईटखेडे, जितू मोरे, एकनाथ पाटील, तालुका सरचिटणीस गजानन पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष लताताई ठोंबरे, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस अनिता भोपळे, शिवसेना शिंदे गटाच्या नांदुरा शहर उपाध्यक्ष सौ प्रज्ञाताई तांदळे ,आशाताई गजानन पाटील, निमगाव चे माजी उपसरपंच विकास इंगळे, पुंजाजी पाटील ,जानराव इंगळे, किसन काटे ,निवास धुळे, भरत काटकर लयंनसिंह कुवारे, उज्वल भाऊ लासुरकर, निलेश वेरुळकर, गोवर्धन पाटील, राजू टवलाकर, बंडू मर्हे, जनार्दन ढोले, संतोष इंगळे, वसीम राजा, आशिष मांडवाले, प्रल्हाद भोपळे, अनंत वावघे ,सुनील खवले, वासुदेव हिवरकर, रवी बोंबटकर, अतुल बावस्कर, श्रीकृष्ण दळवी, नाना इंगळे ,दत्ता टेंभुर्णे, बाबुराव शिवलकर, आकाश भगत ,पंकज चरखे, अनंता भोपळे, विनोद इटखेडे, ज्ञानदेव भोपळे, देविदास मानकर, संजीव साबे, यांच्यासह असंख्य पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी निलेश वेरुळकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद वानखेडे सर यांनी केले यावेळी निमगावात नेत्र तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला
Post a Comment