Hanuman Sena News

मोरबी फुल दुर्घटनेत 70 हुन अधिक लोकांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त जखमी;




 मोरबी : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनेवेळी पुलावर शेकडो लोक उपस्थित होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत जाहीर केली आहे. तसेच, राज्य सरकारने या घटनेच्या तपासासाठी SITची स्थापना केली आहे.सविस्तर माहिती अशी की, आज सायंकाळी 7च्या सुमारास मोरबी शहरातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला पूल अचानक नदीत कोसळला. विशेष म्हणजे, गेल्या सात महिन्यांपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते आणि पाच दिवसांपूर्वीच हा नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. या पुलाच्या दुरुस्तीवर 2 कोटी रुपये खर्च झाले होते. इतके रुपये खर्च करुनही पूल तुटल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची आता चौकशी होणार असल्याची माहिती गुजरात सरकारमधील मंत्री बृजेश मेरजा यांनी दिली. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी बचाव कार्य सुरू केले आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा करून योग्य ते निर्देश दिले आहेत पटेल यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाईची जाहीर घोषणा केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी मृतांसाठी दोन लाख आणि जखमींना पन्नास हजार रुपये जाहीर केले आहेत या पुलाचे उद्घाटन 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते झाले होते 1880 मध्ये सुमारे 3.5 लाख खर्च करून हा पूल बांधला होता त्यावेळी पूल बांधण्याचे साहित्य इंग्लंड मधून आले होते दरबार गड आणि नजर बागला जोडण्यासाठी हा फुल बांधण्यात आला होता मोरबीचा हा केबलपूर 140 वर्षापासून जुना आहे तसेच त्याची लांबी सात सहा पाच फूट आहे हा केबल ब्रिज केवळ गुजरातच्या पूर्वीचा नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे

Post a Comment

Previous Post Next Post