Hanuman Sena News

दिव्यांगांना नगरपालिका अंतर्गत राहिलेल्या 5 टक्के निधीचा वाटप दिवाळीपूर्वी करावा अशी मागणी दिव्यांग फाउंडेशन तर्फे करण्यात आली...


मलकापूर: दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वी 5 टक्के निधीचे वाटप करण्यात यावे.लवकरच दिवाळी सण जवळ आला आहे अशातच महागाई बेसुमार वाढली आहे.त्याकरिता 5 टक्के निधी हा येणाऱ्या 2,3 दिवसात वाटप करण्यात यावा अशे निवेदन देण्यात आले. नगरपालिकेत दिव्यांगासाठी राखीव असलेला 5 टक्के निधीचे वाटप करण्यात यावा.अशी मागणी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष निलेश चोपडे यांच्या मार्गदर्शना खाली उपमुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिव्यांगासाठी स्वनिधीतील पाच टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगासाठी खर्च करा असे आदेश ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना 25 जून रोजी आदेश दिला आहे. हा निधी दिव्यांगासाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जावा बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था वैयक्तिक लाभार्थी योजना वर अधिक खर्च केला व्यक्तिगत विकासासाठी या योजना हाती घेणे गरजेचे असले तरी सदर निधी हा त्याच प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. अशे या  निवेदनात म्हटले आहे त्यावेळी उपस्थित दिव्यांग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे,सचिव शेख रईस,जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे, सहसचिव संतोष गणगे, कोषाध्यक्ष इरफान खान, सदस्य अंकित नेमाडे,रमेश नेमाडे, विवेक राजापुरे, प्रकाश वाघ इत्यादी सभासद उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post