Hanuman Sena News

एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत 150 इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत 1000 सीएनजी बस गाड्यांचा समावेश करण्यात येणार...


एस. टी. महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे, त्यामाध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले. परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज पार पडली. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांचेसह राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार या बैठकीस उपस्थित होते. ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना संप काळात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते, त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती, या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. इलेक्ट्रिक, सीएनजीवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार लोकसंख्येचा भार वाढला त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असून ही संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दीडशे इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेतली जाणार असून ५०० नवीन डिझेल बसेसची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. सुमारे एक हजार बसगाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतरण करण्यात येत असून जून 2023 पर्यंत सुमारे 2018 वरील बसेस महामंडळाच्या ताब्यात समाविष्ट होतील त्यातून प्रवाशांना आरामदायी पर्यावरण पूरक प्रवासाचा आनंद घेता येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले 75 पूर्ण केलेल्या 54 लाख जेष्ठांचा मोफत प्रवास सामाजिक बांधिलकी म्हणून विविधता घटकांना एसटीच्या 21 सवलती दिल्या जातात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठांना मोफत प्रवासाची सवलत देणारा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे सरकारच्या या निर्णयामुळे आतापर्यंत 54 लाख जेष्ठ प्रवाशांनी लाभ घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाचे कौतुक केले मालवाहतूक सेवेतून 107. 80 कोटीचे उत्पन्न एसटीचे महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू केलेल्या मालवाहतूक सेवेतून आजपर्यंत सुमारे 107.80 कोटी उत्पन्न मिळाले असून या सेवेद्वारे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नधान्याची वाहतूक करण्यासंदर्भात तील प्रस्ताव शासनाने सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली तत्त्वावर पासपोर्टचा होणारा विकास एसटी महामंडळाच्या सुमारे 812 ठिकाणी 14 23 .90 हेक्टर च्या जागा असून त्यातील पाच शहरातील अठरा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा डीबीएलटी (डिझाईन बिल ऑपरेटर प्लीज ट्रान्सफर) तत्वावर विकसित करण्यात येणार आहेत त्यातून सुमारे तीन हजार आठशे कोटीपेक्षा अधिक महसूल मिळणार आहे हे करताना त्या जागा केवळ व्यावसायिक वापरासाठी विकसित न करता निवासी वाणिज्य या संमिश्र वापरासाठी करा आणि तसा आराखडा तयार करा असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करा महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून अपघातामध्ये प्रमाण रोखण्यासाठी परिवाहन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या वाहन चालकाचे प्रशिक्षण वाहनांची स्थिती वाहतूक नियमांचे पालन आधी गोष्टींवर भर देऊन व्यापक उपायोजना करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post