Hanuman Sena News

राज्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येवू नये...

संभाजी ब्रिगेडची उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

योगेश काजळे
विशेष प्रतिनिधी
दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री योगेश दादा पाटील यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शालेय शिक्षण व विभागाचा निर्णय हा रद्द करण्यात यावा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच तांडे वाडी वस्ती व आदिवासी बहुल क्षेत्रात अधिक प्रमाणात आहेत ह्या शाळा बंद झाल्यास तेथील मुलांच्या व विशेषता मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते कायमचे शिक्षण प्रवाहापासून दूर लोटले जातील कारण आहे आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत गाव वस्तीच्या बाजूला नद्या नाले असल्यामुळे पावसाळ्यात या भागाचा अनेक दिवस संपर्क तुटतो कुठलेही दळणवळणाचे साधन नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणाकरता बाजूच्या दुसऱ्या शाळेत जाऊ शकत नाही त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून विद्यार्थी संख्या अभावी कुठलीही शाळा बंद करण्यात येऊ नये तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षक भरती करावी शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून टाकावीत व पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे सदर निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री योगेश दादा पाटील, एस पी संबारे सर, रवींद्र भोलवणकर, गजानन संबारे, श्रीकृष्ण क्षीरसागर, एकनाथ संबारे ,गणेश वनारे  आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post