Hanuman Sena News

जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी श्र्वेताताई महाले व संजय भाऊ कुटे यांचे नाव चर्चेत...

बुलढाणा राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन दोन महिने झाले आहेत मात्र अजून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त उजाडला नाही .मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विजयादशमीच्या मुहूर्तावर आता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळात दुर्लक्षित झालेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. आता या विस्तारात कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जिल्ह्यातून श्वेता ताई महाले आणि संजय भाऊ कुटे यांची मंत्रिमंडळात वर्णी फिक्स असल्याचे सुद्धा राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यात जिल्ह्यांना अजून पालकमंत्री नसल्याने विकास कामे खोळंबल्याचा विरोध, पक्षाचा आरोप सातत्याने सुरू आहे. त्यातच पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने काही जण नाराज आहेत. विशेषतहा शिंदे गटात येऊन आपण काय मिळवले असा प्रश्न बच्चू कडू यांच्यासारख्या आमदारांना पडला आहे. त्यामुळे असंतोष अधिकचा उफाळून येऊ नये याची काळजी घेताना मुख्यमंत्री शिंदेचा कसं पणाला लागणार आहे. बुलढाणा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास जिल्ह्यात भाजपाचे तीन आणि शिंदे गटात दोन आमदार आहेत. खामगावचे आमदार आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांची या स्पर्धेतून माघार असल्याचे बोलले जाते .त्यामुळे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले आणि जळगाव जामोद चे आमदार संजू भाऊ कुटे या दोन नावांची भाजपाच्या कोठ्यात चर्चा आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाने महिला आमदारांना संधी दिली नाही त्यामुळे या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी भाजप व शिंदे गटाला टारगेट केले आहे. त्यामुळे आता या विस्तारात महिला आमदारांना संधी द्यावीच लागणार आहे त्यातही चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले या पहिल्यांदाच आमदार झालेल्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे राज्यभरात त्या लढवय्या आणि आक्रमक स्वभावाने परिचित झाल्या आहेत. याशिवाय प्रशासनात सुद्धा त्यांची मजबूत पकड निर्माण केल्याने त्यांना या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्री पदाची संधी मिळणारच असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. दुसरीकडे जळगाव जामोद चे आमदार संजय कुटे यांना तर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती. मात्र ती तेव्हा हुकल्याने आता मंत्रिपद जवळपास निश्चित आहे.आता उरला मुद्दा शिंदे गटातील उरलेल्या दोन आमदारांना काय मिळणार याचा.. तर त्याचे असे आहे की शिंदे गटाच्या कोट्यातील केवळ सहामंत्रीपदे शिल्लक आहेत. त्यात बच्चुभाऊ कडू, संजय शिरसाठ, शहाजी बापू पाटील, यांच्यासारख्या नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळात विस्तारावेळी चर्चेत असलेल्या आमदार रायमुलकरांच्या आशेवर पाणी फेरल्या जाण्याची शक्यता दिसत आहे .असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post