Hanuman Sena News

आज शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे बुलढाण्यात शिव सैनिकांना करणार मार्गदर्शन...

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी अंबादास दानवे यांच्यावर शिवसेनाप्रक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी संपवली आहे त्यानिमित्त बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधावत व जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी संयुक्तरीत्या केले आहे शिवसेना ही सत्तेत नव्हे तर समाजासाठी आहे जिल्ह्यात अधिक जोमाने शिवसेना संघटन मजबूत करण्यासह येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना उभारी मिळावी या दृष्टिकोनातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हा मेळावा शुक्रवारी गर्दे सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत यावेळी जिल्हाप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर ,सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, भास्करराव मोरे, छगनराव मेहत्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बडे, यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, प्रमुख उपस्थित राहणार आहेत या सत्कार सोहळा व मेळाव्यासाठी शिवसेना अंगीकृत संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर मुदाबत व जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post