Hanuman Sena News

पशू पालकांना चिंतामुक्त करण्यासाठी पशू वैद्यकीय दवाखान्या मार्फत पुरेशा प्रमाणात मोफत लंपिरोधक लसीकरण राबवा ...मा.चेनसुख संचेती

योगेश काजळे
विशेष  प्रतिनिधी
आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी पशू वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्री चैनसुख संचेती यांनी नमूद केले आहे की शेतकरी पशुपालकांचे उत्पन्नाचे साधन असलेल्या पशुधनास सध्या लंपि ह्या आजाराने ग्रासले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आजाराने थैमान घातले असून लंपी आजाराची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे पशुमालक सध्या खूपच चिंतेमध्ये आहे  अशा परिस्थितीमध्ये पशु मालकांना आपले पशुधन वाचवण्यासाठी वैद्यकीय स्तरावरून मोफत लसीकरणाचे नितांत आवश्यकता आहे त्यामुळे आपण ह्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेऊन मलकापूर तालुक्याचा संबंध जिल्ह्यात जनावरांना निशुल्क व पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post