पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर शिरोमणी अकाली दलचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी गंभीर आरोप केले आहे भगवंत मान जर्मनी मधून हिंदुस्थानात परत येत असताना ते दारूच्या नशेत(अतिसेवन ) होते त्यामुळे जर्मनीच्या लुफ्थांसा एअरलाइन्सने त्यांना विमानातून उतरवल्याचा दावा बादल यांनी केला आहे बादल यांनी व्टिटरवरून एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत हा गंभीर आरोप केला आहे. भगवंत मान हल्लीच जर्मन दौऱ्यावर गेले होते तिथून परत येऊन त्यांना आपचे राष्ट्रीय बैठकीला हजर राहायचे होते मात्र तेथून येत असताना ते दारूच्या नशेत(अतिसेवन ) होते असा आरोप बादल यांनी केला आहे बादल यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉट नुसार मान हे जेव्हा एअरलाईन मध्ये चढले त्यावेळी ते दारूच्या नशेत(अतिसेवन)होते त्यांना धड त्यांच्या पायावर उभे राहता येत नव्हतं त्यांना त्यांच्या सोबतची लोक व त्यांच्या पत्नी सावरत होत्या .त्यामुळे लिफ्ट लुफ्थांसा एअरलाइन्सने त्यांना फ्लाईट मधून उतरण्यास सांगितले मान यांच्यासोबत असलेल्यांनी तसे न करण्याची विनंती फ्लाईड मधील स्टाफला केली मात्र प्रवासांच्या सुरक्षते खातर त्यांना फ्लाईट मधून उतरवण्यात आले त्यांच्यामुळे फ्लाईटला तब्बल चार तास उशीर झाला असे बादल यांनी सांगितले.
दारूच्या नशेत असलेले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून उतरवले बादल यांचा गंभीर आरोप...
Hanuman Sena News
0
Post a Comment