Hanuman Sena News

अंधश्रद्धेतून भावानेच केला वृद्ध बहिणीचा खून...

धाड / रुईखेड मायंबा (जि.बुलढाणा) : बहिणीने भानामती (करणी कवटाळ) करुन मुलाला मारुन टाकले. या संशयातून चक्क भावानेच कुटुंबियांच्या मदतीने वृद्ध बहिणीचा खुन केला. ही धक्कादायक घटना बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथे २९ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणातील चार आरोपीविरुद्ध धाड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चांडोळ येथील मृतक धनाबाई सुभाष गोमलाडू (६०) यांचे शेत पासोडी-चांडोळ रस्त्यावर आहे. धनाबाई गोमलाडू या २८ सप्टेंबर रोजी शेतामध्ये गेल्या होत्या, परंतु त्या सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा व नातेवाईकांनी गावात तसेच आजु-बाजुच्या परिसरात शोध घेतला. तेव्हा शामराव राऊत यांच्या शेतातील विहिरीत रात्री उशिरा प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल पाटील हे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन तपास सुरु केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.फिर्यादनंतर आली तपासाला गती
घटनेची फिर्याद मृतक महिलेचा जावाई गेंदुसिंग भाऊलाल पाकळ यांनी धाड पोलिसांत दिली. त्यामध्ये मृतक महिलेने आमच्या तरुण मुलास भानामती करून मारल्याचा संशय मारेकऱ्यांना होता. मुलाच्या मृत्यूचा वचपा काढण्यासाठी चक्क भावनेच बहिणीचा खून केला असे तक्रारीत म्हटले होते. अशा फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी हिरालाल रतनसिंग बलावणे (६२), गोपीबाई हिरालाल बलावणे(५८), संजय हिरालाल बलावणे (३५) व रंजित हिरालाल बलावणे (४०) या चारही आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post