मोताळा
श्री गजानन महाराज जन्मस्थान थळ गावी ऋषिपंचमी सण मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली हजारो भाविक श्री चरणी नतमस्तक झाले व गजानन महाराज पुण्यतिथी मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली कोरोणाच्या संकट काळात सारे सण साजरा करता आले नाही पण यावर्षी हर्ष उत्सवात ऋषिपंचमी सण मोताळा तालुक्यातील थळ गावी साजरी करण्यात आली मोताळा तालुक्याचे प्रति पंढरपूर म्हणून श्री गजानन महाराज जन्मस्थान प्रतिष्ठान थळ या गावाची ओळख आहे जिल्ह्याचे प्रती पंढरपूर शेगाव तर मोताळा तालुक्याचे प्रति पंढरपूर म्हणून थळ गावाची ओळख आहे तसेच जळगाव - बुलढाणा जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात तालमृदुंगांच्या आवाजाने सारा परिसर दुमदुमला होता येथे हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच धामणगाव- बढे पोलीस प्रशासनाने येथे चोख बंदोबस्त ठेवला होता.
Post a Comment