Hanuman Sena News

महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदू मुलीच्या धर्मांतरासाठी फक्त २००० हजारात विवाह प्रमाणपत्र देतात... नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी मदत करतात. फक्त दोन हजार रूपयांमध्ये विवाह प्रमाणपत्र देण्यात येते असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत केला आहे. दरम्यान अशा विवाह संस्थांवर कारवाई करून संबंधित आरोपींना अटक केली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.“महाराष्ट्रातील काही विवाहसंस्था मोठ्या प्रमाणात हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहन आणि समर्थन देत आहेत. या विवाहसंस्थामध्ये फक्त २००० रुपयांमध्ये खोटी विवाह प्रमाणपत्रं दिली जात आहेत. अशा विवाहसंस्था बंद करुन, या लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे होईल याची आपण खात्री करु,” असे नितेश राणे म्हणाले आहेत.महाराष्ट्रासाठी हा फार गंभीर प्रश्न आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवले जाते. मुलीवर अत्याचार करत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना फसवले जाते आणि त्यासाठी त्यांना ताकद दिली जाते, असा मुद्दा नितेश राणेंनी पावसाळी अधिवेशनातही उपस्थित केला होता.पुढे ते म्हणाले होते “हिंदू मुलींचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी पैसे दिले जातात, बाईक दिली जाते. धर्मपरिवर्तनाला बळ देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड करण्यात आले आहे. शीख तरुणीला फसवले तर सात लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवले तर सहा लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीसाठी सहा लाख, ब्राह्मण तरुणीसाठी पाच लाख, क्षत्रिय तरुणीसाठी चार लाख असे रेट कार्ड आहे. तरुणींना विकण्यापर्यंत यांची मजल जात आहे. धर्म परिवर्तनाच्या नावाखाली मुलींचे आयुष्य बर्बाद केले जात आहे”. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post