प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते तथा शहराध्यक्ष श्री श्यामभाऊ राखोंडे व जेष्ठ समाजसेविका तथा महिला शहराध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांच्या नेतृत्वात मोदींजीना पाठविली कृज्ञतापूर्वक पत्रे ज्यांनी भारताला संपूर्ण जगामध्ये शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण देशांच्या यादीमध्ये समाविष्ट केले असे गतिशील, समर्पित व दृढनिश्चयी व्यक्तिमत्व मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो या सद्भावनेतुन नांदुरा शहर व तालुका (ग्रामीण) भाजपा महिला मोर्चा व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज शनिवार दि. १७/०९/२०२२ रोजी नांदुरा शहरातील स्थानिक बालाजी मंदीर येथील हनुमान मूर्तीला जलाभिषेक करून *सेवा सप्ताह कार्यक्रमाचा श्रीगणेशा* करण्यात आला.मा. भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळेजी, मा. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. उमाताई खापरे, मा. जिल्हाध्यक्ष श्री आकाशदादा फूंडकर* यांच्या आदेशावरून तसेच भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा *सौ. सिंधुताई खेडेकर, भाजपा नेते तथा माजी आमदार श्री चैनसुखजी संचेती* यांच्या मार्गदर्शनात व नांदुरा शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते *श्री श्यामभाऊ राखोंडे* व जेष्ठ समाजसेविका तथा महिला शहराध्यक्ष *सौ. सारिकाताई डागा* यांच्या नेतृत्वात शहरातील संत निरंकारी भवन येथे हनुमान चालिसा पठण व विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी *किसान योजना, उज्ज्वला योजना, घरकुल योजना, मोफत राशन वाटप व स्वच्छता अभियान यांसारख्या लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून* जी समाजाभिमुख कार्ये केली व त्याद्वारे देशाची विस्कटलेली घडी नीट बसविली यानिमित्ताने त्यांना कृतज्ञतापूर्वक पत्रे पाठविण्यात आली.यावेळी श्री बंटीभाऊ फणसे, श्री उमेश भाऊ ताकवाले, गोपालभाऊ नालट, सागरभाऊ धामोडे, गणेशभाऊ राखोंडे, बजरंग दलचे सदस्य विशाल भाऊ धंगेकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ. लताताई ठोंबरे, जिल्हा सचिव सौ. अनिताताई चौधरी, शहर महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ जयश्रीताई पिंपरे, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका सौ. ज्योतीताई तांदळे, शहर महिला मोर्चा सोशल मीडिया संयोजिका सौ रेणू ताई डागा, लिलाबाई इंगळे, सुशीला ताई घन, रुखमाताई उगले, रेखाताई राखोंडे, , अक्षयभाऊ घन, राहुल भाऊ, दिलीपभाऊ, दिनेश भाऊ, बंटी भाऊ, यांच्यासह नांदुरा शहर व तालुका भाजपा, महिला मोर्चा व युवा मोर्चा यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते._
Post a Comment