बुलडाणा (प्रतिनिधी) : देशाचे कर्तृत्ववान व विकासभिमुख नेतृत्व आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमीत्त संपुर्ण देशभरात सेवासप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असुन बुलडाणा शहरात भाजपा जनता युवा मोर्चाच्यावतीने भाजपा तालुका सरचिटणीस डॉ.राजेश्वर उबरहंडे यांच्या श्रीकृपा हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबीराचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मा.सौ.श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार मा.विजयराज शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी बुलडाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा.संजय गायकवाड यांनी रक्तदान शिबीराला भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या. सदर शिबीरात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमीत्त 72 व्यक्तींनी रक्तदान केले. तर 320 व्यक्तींनी अवयवदानाचे अर्ज आयोजकांकडे सुपूर्द करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात योगदान दिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.सुनिल देशमुख, डॉ.राजेश्वर उबरहंडे, पद्मनाभ बाहेकर, मंदार बाहेकर, सिद्धार्थ शर्मा, ऍड.पराग वाघ, संदीप उगले, योगेश राजपूत, सोहम झाल्टे, सतिश पाटील, प्रदीप मांडवगडे, यश तायडे, अमोल पडोळ, जयेश पडोळ, प्रवीण गाडेकर, ऍड.दशरथसिंग राजपूत, पंजाबराव इलग, गणेश पांडे, गजानन देशमुख, विजय हिवाळकर, राजु पाठक, गणेश देहाडराय, सिद्धेश्वर पडोळ, दत्ता पाटील, सौ.विजयाताई राठी, अरविंद होंडे, सौ.स्मिता चेकेटकर, अभिषेक वायकोस, दत्ता शेवाळे, सिंध्दु लडके, दत्तात्रय जेऊघाले, उदय देशपांडे, ज्ञानेश्वर देशमुख, परमेश्वर उबरहंडे, निलेश चौथे, कैलास खेडेकर, श्रीकुमार पाठक, नितीन बेंडवाल, किरण नाईक, वैभव राजपूत, मोहित भंडारी, ज्ञानेश्वर देशमुख, पंढरी सुरुशे, गोपाल राजपूत, शंकर मोहिते, निलेश चौथे, गौरव लोखंडे, बंडू चिंचोले, दिलीप काळे, लक्ष्मण डिघे, उमेश गाडेकर, योगेश पडोळ, सिद्धू लकडे, राजू नाटेकर, अनिल उबरहंडे शुभम डव्हळे, आकाश वाघ, दिलीप ताठे, आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment