डॉ.ज्योतीयाई विनायकराव मेटे यांची शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवसंग्राम राज्य कार्यकारिणीची बैठक पुणे येथे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष स्व.विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या पत्नी डॉ.ज्योतीताई मेटे यांनी स्वीकारावी. भाजपचा मित्रपक्ष या नात्याने आपली चोख कामगिरी बजावणाऱ्या शिवसंग्रामला न्याय देत भाजपने राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्यपदी डॉ.ज्योतीताई मेटे यांची शिफारस करावी. तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात डॉ.ज्योतीताई मेटे यांना स्थान द्यावे,अशा स्वरूपाचे ठराव शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी पुणे येथील शिवसंग्रामच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीदरम्यान एकमताने मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. या बैठकीला राज्यभरातून शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्व.विनायकरावजी मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर शिवसंग्रामची धुरा कोण सांभाळणार ? शिवसंग्रामच्या भवितव्याचे काय ? अशा सर्व प्रश्नावर आज शिवसंग्रामच्या कार्यकारणी बैठकीमध्ये पडदा पडला. शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्व. विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योतीताई मेटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीसाठी राज्यभरातून विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. विनायकरावजी मेटे साहेबांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसंग्राम संघटना सर्व पदाधिकारी, मावळे, गोरगरीब, वंचित समाज, यांच्यासोबत आहे. असा ठाम विश्वास डॉक्टर ज्योतीताई मेटे यांनी यावेळी व्यक्त केला
स्वर्गीय मेटे साहेबांची सावली आता शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची होणार माऊली ...
Hanuman Sena News
0
Post a Comment