काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केरळच्या कोल्लममध्ये एका दुकानदाराने या यात्रेला चंदा न दिल्यामुळे आपल्या दुकानाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. एस. फवाज असे त्यांचे नाव असून, ते कोल्लममध्ये भाजी विक्री करतात. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधारकरन यांनी 3 कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.एस. फवाज यांनी सांगितले की, 14 सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी दुकानावर येऊन भारत जोडो यात्रेसाठी चंदा मागितला. मी 500 रुपये दिले. पण त्यांनी 2 हजार रुपयांचा आग्रह धरला. एवढी मोठी रक्कम देणे आपल्यासाठी शक्य नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी माझ्या दुकानाची मोडतोड करून भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला.भाजी विक्रेत्याच्या दुकानाची मोडतोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दुकानदाराने या प्रकरणी कुनिकोडी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.घटनेत युवक काँग्रेसच्या सरचिटणीसाचा हात आहे. पीडित दुकानदाराने या प्रकरणी कुनिकोडी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, दुकानात तोडफोड करणाऱ्यांत युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनिस खान यांचा समावेश आहे. खान आपल्या 5 सहकाऱ्यांसह त्यांच्या दुकानावर आले होते. त्यांनी चंदा न दिल्यामुळे दुकानाची मोडतोड केली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने 3 कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केली.कार्यकर्त्यांचा व्यवहार अस्वीकारार्ह आहे केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के सुधारकरण म्हणाले - आम्ही दुसऱ्या पक्षांसारखा कॉर्पोरेट फंडाचा पैसा घेत नाही. आम्ही छोट्या पातळीवर चंदा गोळा करतो. लोक काँग्रेसला स्वतःच्या इच्छेने पैसे देतात. कोल्लमच्या घटनेप्रकरणी 3 कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आले आहे ते आमच्या विचारधाराचे प्रतिनिधित्व करत नाहीत त्यांचा व्यवहार पूर्णतः अयोग्य आहे असे त्यांनी सांगितले
काँग्रेसची "भारत जोडो यात्रा" पुन्हा एकदा वादात सापडली...
Hanuman Sena News
0
Post a Comment