Hanuman Sena News

वितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत द्या :- मा.आ.चेनसुखजी संचेती

नांदुरा- तालुक्यातील महाळुंगी येथील शेतकरी शुभम सुभाष चवरे यांच्या बैल जोडीला शेतातील रस्त्यावर पडलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारेचा शॉक लागून दोन बैलांचा मृत्यू झाला त्या शेतकऱ्यास तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी मा.आ.चेनसुख संचेती यांनी केली नांदुरा तालुक्यातील महाळुंगी येथील शुभम सुभाष चवरे हे आपल्या शेतामध्ये जात असताना वीज वितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे शेतातील रस्त्यावर तुटलेल्या विद्युत तारा पडलेल्या होत्या त्याला बैलाचा स्पर्श झाल्याने त्यात त्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला यावेळी सदर शेतकरी शुभम चवरे हे बैलगाड्यावर असल्याने व बैलगाडाच्या लाकडी पाट्या असल्याने ते बचावले यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे २ लाख रुपये नुकसान झाले आहे आज मा.आ. चेनसुख संचेती यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी उपस्थित असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडे केली त्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही यावर तातडीने कारवाई होण्याकरिता सुचित केले यावेळी अनिल इंगळे माजी सभापती नांदुरा, रवी खंडारे, वैद्यकीय अधिकारी दळवी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी राजहंस व गावकरी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post