कुजलेल्या अवस्थेत एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी सकाळी राजुर घाटातील मंदिराखाली खोलदरीत उघडकीस आली होती.या अनोळखी तरुणांच्या मृतदेहाची ओळख पटली असून तो राजूर येथील रहिवासी असून मित्रांनी त्याचा खून केल्याची माहिती पोलीस सूत्रांना मिळाली राजूर येथील अजीम खान व सय्यद अझर, शेख साहिल हे तिघे जिवलग मित्र होते तीन-चार दिवसापूर्वी त्यांच्यात शिल्लक कारणावरून वाद झाला होता. हा वाद तेथेच मिटवण्यात आला होता. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा हा वाद उफाळून आला यावेळी रागाच्या भरात सय्यद अझर व शेख साहिल या दोघांनी अजीम खान यास बेदम मारहाण केली. मारहाणी दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अजहर व साहिल यांनी अजीमचा मृतदेह राजुर घाटातील एका खोल दरीत फेकून दिला. या घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळताच ठाणेदार पाटील साहेब, पीएसआय अशोक रोकडे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला परंतु अंधार झाल्यामुळे त्यांना मृतदेह सापडला नाही त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा परिसर पिंजून काढला असता त्यांना खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह मिळून आला. घटनास्थळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मृताच्या शरीरावर जखमाचे वर्ण असल्याने घातपाताची शंका पोलिसांना झाली त्यानंतर पोलिसांनी अजहरआणि शेख सहील या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याची कबुली दिली याप्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनचे पोलीस चौकशी करीत आहेत
मित्रानेच मित्राचा केला खून...
Hanuman Sena News
0
Post a Comment