Hanuman Sena News

शहरातील अवैध धंदे बंद करा अन्यथा मलकापूर शहर पोलीस स्टेशन समोर अवैध धंदे करण्याची परवानगी देण्यात यावी... प्रहार जनशक्ती पक्ष


मलकापूर:- शहरातील अवैध धंदे बंद करा अथवा मलकापूर शहर पोलीस स्टेशन समोर अवैध धंदे करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे ८ सप्टेंबर रोजी एका निवेदनात व अर्जाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की मलकापूर शहरांमध्ये गेल्या काही महिन्यापासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. यामध्ये वरली खेळविणे तसेच गुटखा व अवैध दारूची सरास विक्री सुद्धा केली जात आहे. या अवैध व्यवसायामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागते चौका चौकामध्ये या अवैध व्यवसायिकांमुळे अनेकांना त्रास होतो. अनेक वरलीचे व्यवसाय करणारे तर ठीक ठिकाणी जागा मिळेल तिथे आपला व्यवसाय करताना दिसतात. त्याचप्रमाणे शहरातील अनेक ठिकाणी प्रतिबंध घालण्यात आलेल्या गुटखापुढ्यांची सर्रास व खुलेआमपणे  जोरात विक्री सुरू आहे. तसेच अवैध दारूचा जणू मलकापूर शहरात महापूरच आला आहे. याबाबत तक्रार होऊनही कुठलीही ठोस अशी कारवाई करण्यात येत नाही. तेव्हा मलकापूर शहरातील सुरू असलेले हे अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे अन्यथा आम्हाला मलकापूर शहर पोलीस स्टेशन समोरच अवैध धंदे करण्याची परवानगी देण्यात यावी. मलकापूर शहरातील हे अवैध धंदे बंद करण्याबाबत कुठलाही ठोस उपाययोजना तातडीने न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या काळात जनआंदोलन उभारण्यात येईल असेही दिलेल्या निवेदनात अजय टप यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post