Hanuman Sena News

मोबाईलवर मंगलाअष्टक लावून अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आला...

खामगाव:- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिला मध्य प्रदेशात देण्यात आले. तिथून सासरच्या लोकांची नजर चुकवून मिळेल त्या वाहनाचा आधार घेत पळ काढून खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून मुलीच्या आई-वडिलांसह तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील अकोला बायपास वरील मोठ्या हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या शितल (नाव बदलले आहे) या प्रकरणाची तक्रार दिली. शितल सध्या दहाव्या वर्गात शिकते संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे तिचे मामा राहतात 25 जुलै रोजी ती तिच्या आई-वडिलांसह मामाच्या घरी गेली होती. दरम्यान त्याच दिवशी मामाच्या घरी दोन-तीन महिला व पुरुष असे पाहुणे आले होते. पाहुण्यांसोबत आलेल्या मुलासोबत तुझे लग्न लावायचे आहे असे शितलच्या आई-वडिलांनी सांगितल्यावर तिला प्रचंड धक्का बसला. तिने नकार दिला मात्र आई-वडिलांनी धनकावल्याने तिने लग्नाची तयारी केली. मोबाईल मध्ये मंगलाष्टक लावून आणि गळ्यात हार घालून तिचे त्याच दिवशी लग्न लावून देण्यात आले. दरम्यान लग्नानंतर तिला मध्यप्रदेशातील उमरिया या गावी नेण्यात आले. कुणाला काही सांगितल्यास तुला जीवाने मारून टाकू अशी धमकी तिचा नवरा रोहित कावरे व सासू-सासरे देत होते. तिथे तिला मारहाण करण्यात येत होती .त्यातच त्यांची नजर चुकवून ऑटो,बस व मिळेल त्या वाहनाने तिने खामगाव गाठले. १५ सप्टेंबर रोजी तिने तिच्या आत्याला सोबत घेऊन खामगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शीतलच्या आई-वडिलांसह तिच्याशी लग्न करणाऱ्या रोहित कावरे ( २५ ) व सासू-सासरे अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास खामगाव पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post