Hanuman Sena News

बोगस जात प्रमाणपत्र खा.नवनीत राणांच्या अडचणीत वाढ...

अमरावती:- राजकीय आक्रमकता,राज्यभरात त्या लढवय्या आणि आक्रमक स्वभावाचे परिचित झाले आहेत याशिवाय हमेशा चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे मुंबईतील न्याय दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजमीन पात्र वॉरंट बजावले आहे त्यांनी राखीव कोट्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे या प्रकरणात न्यायालयाने त्यांच्या वडिलांनाही जामीन मात्र वॉरंट बजावले आहे दोघांविरुद्ध मागील महिनाभरात बजावण्यात आलेले हे दुसरे वॉरंट आहे नवनीत राणा अमरावतीतील ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या तो मतदार संघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करून ती निवडणूक लढवली मात्र त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला मध्ये फेरफार करून मिळाल्याचे आढळून आले त्यानंतर नवनीत राणा व त्यांचे वडील हारभजनसिंग रामसिंग पुंडलेस यांच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात न्याय दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या विरोधात महिनाभरात दुसऱ्यांदा वॉरंट जारी केले आहे पोलिसांनी दोघांना विरोधात याआधी आरोप पत्रही दाखल केले आहे गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला होता त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेशाला स्थगिती दिल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला होता

Post a Comment

Previous Post Next Post