जम्मू-काश्मीरच्या एका सरकारी शाळेत भजन, गायन व सूर्यनमस्कारावरून वादंग निर्माण झाले आहे. याप्रकरणी मुत्ताहिदा मजलिस-ए-उलेमाने (एमएमयू) ही कृती काश्मीरमधील मुस्लिमांच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे भजन म्हणण्यावर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. परंतु तसे झाले नाही तर लोकांनी सरकारी शाळांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले आहे.एमएमयू जम्मू-काश्मीरमधील ३० इस्लामिक धार्मिक, शैक्षणिक संघटनांची शिखर संघटना आहे. अध्यक्षस्थानी जामिया मशिदीचे मुख्य मौलवी व हुर्रियत अध्यक्ष मिरवेज उमर फारूक आहेत. मिरवेज सध्या नजरबंद आहेत. एमएमयूने या मुद्द्यावर एक बैठक घेतली. भजन, सूर्यनमस्कारासारख्या प्रथांना रोखण्याची मागणी त्यांनी सरकार व शिक्षण विभागाकडे केली आहे. ही बाब मुस्लिमांची धार्मिक भावना दुखावणारी आहे. या गटाने सकाळी घेणारे योग तसेच अशा प्रकारच्या प्रार्थनेवरही त्यांनी टीका केली. हिंदुत्वाच्या अजेंड्याला प्रोत्साहन देऊन मुस्लिम ओळख पुसण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. ही कृती इस्लामी परंपरांसाठी आव्हान देणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुस्लिम शिक्षकांनी देखील अशा कृतीला प्रोत्साहन देऊ नये. त्यापासून दूर राहण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.कुलगाम जिल्ह्यातील सरकारी शाळेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. गेल्या आठवड्यापासून हा वाद सुरू झाला. व्हिडिओमध्ये शिक्षक व मुले रघुपती राघव राजा राम गाताना दिसून येतात. तो व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती यांनी भारतीय जनता पार्टी व जम्मू कश्मीर मध्ये हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोप केला आहे
जम्मू-काश्मीरमध्ये शाळेत सूर्यनमस्कारास विरोध भजन बंद करा, अन्यथा आमची मुले शाळेतून काढून टाकू संघटनांचा इशारा...
Hanuman Sena News
0
Post a Comment