राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरगुती दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंनी जोरदार निशाणा साधला आहे. साम-दाम-दंड भेदचा वापर करून आणि ५० खोके सर्व काही ओके करून हे सरकार ओरबडून आणलं. पण मागील अडीच महिन्यात काहीही काम झालं नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.सुप्रिया सुळेंच्या या टीकेला भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात पवार कुटुंबीय सोडून कुणी मोठं झालेलं सुप्रिया सुळे यांना सहन होत नाही. हेच त्यांचं मोठं दुखणं आहे, अशी टीका पडळकरांनी केली आहे. ते ‘टीव्ही९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता गोपीचंद पडळकर म्हणाले की, “महाराष्ट्रात पवार कुटुंबीय सोडून कुणी मोठं नाही, हेच सुप्रिया सुळे यांचं सर्वात मोठं दु:ख आहे. त्यांचे वडील शरद पवार हेच या राज्याचे मुख्य आहेत. तेच राज्यामध्ये काहीतरी राजकीय बदल करू शकतात, असं त्यांना वाटतं. या विचाराला एकनाथ शिंदेंनी छेद दिला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फार मोठी साथ दिली.” भारतीय जनता पार्टीने एका सर्वसामान्य मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं हे सगळ्यात मोठे दुखणं पवार कुटुंबीयांचा आहे अजित पवारही फुटले होते पण त्यांच्या मागे दोन आमदारही राहिले नाहीत एकनाथ शिंदे मागे 50 आमदार ठामपणे उभे राहिले त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या पोटातील दुखणे वेगळा आहे आणि ते बोलतात वेगळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत आहे हे त्यांना सहन होत नाही अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रात पवार कुटुंबीय सोडून कोणी मोठं झालेलं सुप्रियाताई सुळे यांना सहन होत नाही... गोपीचंद पडळकर
Hanuman Sena News
0
Post a Comment