महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात करत असून, शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उडी घेत शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले. शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला. शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात औद्यागिक क्रांती का नाही झाली, अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे. विरोधकांना कामधंदा काय आहे? विरोधकांनी आयुष्यात काय केलेय? अडीच वर्ष मातोश्रीवरच राहून सरकार चालवले. सगळ्या तडजोडीच केल्या आहेत. तडजोडीमुळेच हे उद्योग गेले आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या तडजोडीमुळे उद्योग गेले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती का नाही झाली?सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला, या शब्दांत नारायण राणे यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेचा रोखठोक शब्दांत समाचार घेतला.फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ हे बोलणे म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखे आहे. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमीच प्रथम क्रमांकावर होता. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जातो हे खरेच दुर्दैवी आहे यानंतर काही लोकांनी सांगितले की हा निर्णय बदलावा महाराष्ट्रात आणावा हे काही होणार नाही आता यावर चर्चा करण्यात अर्थ नाही तसेच ठाकरे सरकारवर याचे खापर फोडणे योग्य आहे कारण एकनाथ शिंदे आणि उदय सावंत तत्कालीन मंत्रिमंडळात मंत्री होते असे सांगत शरद पवार यांनी शिंदे भाजपा सरकार व निशाणा साधला
शरद पवार ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते औद्योगिक क्रांती का नाही झाली?... नारायण राणे
Hanuman Sena News
0
Post a Comment