Hanuman Sena News

भाजपा नेते व माजी आमदार श्री चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या विरोधात कठोर कार्यवाही करून श्रीचैनसुख संचेती यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे... भाजपा कार्यकर्त्यांची मागणी


योगेश काजळे
विशेष प्रतिनिधी
मागील एक ते दोन दिवसा अगोदर दिल्ली येथे भाजपा नेते चैनसुख संचेती तसेच बुलढाणा अर्बन चे राधेश्याम चांडक यांच्या अपहरणाचा डाव रचणाऱ्या संशयित आरोपींना आय बी ने ताब्यात घेतले होते व पुढील कार्यवाहीसाठी सदर संशयित यांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले होते त्यानंतर बुलढाणा पोलीस प्रशासनाने सदर संशयतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिले होते याच विषयाला अनुसरून दिनांक 15 सप्टेंबर रोजी मलकापूर विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की भाजपा नेते श्री चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट दिल्ली आयबीने उधळून लावला असून  त्यामधील काही संशयित आरोपींना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले गेले होते परंतु बुलढाणा पोलिसांनी त्यांच्यावर केवळ प्रतिबंधात्मक कार्यवाही करून त्यांना सोडून दिले त्यामुळे अशा आरोपींची कठोर चौकशी करून श्री चैनसुख संचेती यांना पुरेशी पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी मलकापूर विधानसभा भाजपा पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे केली यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते श्री मोहनजी शर्मा मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष श्री मिलिंद जी डवले मलकापूर तालुका भाजपाध्यक्ष श्री संजय काजळे पाटील नांदुरा शहर भाजपा अध्यक्ष श्री श्याम राखुंडे नांदुरा तालुका भाजपाध्यक्ष श्री संतोष मुंडे तसेच श्री संतोष बोंबटकर गणेश भोपळे गजानन पाटील श्री दत्ताभाऊ सुपे श्री उमेश ताकवले श्री सुधीर मुरेकर श्री संजय फणसे श्री प्रमोद हिवाळे श्री लक्ष्मण झांबरे शैलेश मिरगे कैलास डांगे ब्रह्मानंद चौधरी अमोल डहाके अरुण भाऊ पांडव प्रवीण पाटील विजय कडूजी पाटील अभिजीत भगत अनिल इंगळे सनी तेलंग प्रशांत वडोदे शिवाजीराव पाटील गजानन चरखे , सौ अनिता चौधरी, सौ सिंधुताई खेडेकर श्री शिवाजीराव पाटील गजानन चरखे अनिता चौधरी अर्चनाताई पाटील सारिकाताई डागा ज्योती ताई बढे यांच्यासह असंख भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या काळात जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब या बाबीकडे कशा प्रमाणात लक्ष देतात याकडे संबंध जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे

Post a Comment

Previous Post Next Post