Hanuman Sena News

बुलढाणा अर्बन चे अध्यक्ष राधेश्याम चांडक व मलकापूर भाजपाचे माजी आमदार चेनसुख जी संचेती यांच्या अपहरणाचा कट उधळला...

बुलढाणा : झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत बँक लुटून लुटलेल्या पैशातून एक ऑफिस तयार करून एक कार विकत घेऊन त्या कारमध्ये बुलढाण्यातील श्रीमंत असलेले बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक व मलकापूर विधानसभेचे भाजपाचे माजी आमदार चेनसुखजी संचेती यांना किडनॅप करण्याचा बुलढाणा शहरातील राहणारे तिघांचा प्लॅन होता अशी खळबळ जनक माहिती दिल्ली आयबी ने अटक केलेल्या आरोपीं कडून समोर आली आहे मिर्झा अवेझ बेग (21) शेख साकिबशेख अन्वर(20) उबेद खान शेरखान ( 20 )अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे हे सर्व बुलढाणा शहरातील शेर -ए- अली चौकातील राहणारे आहेत तिघेही काही दिवसाआधी दर्शन करिता अजमेर येथे गेले होते सध्या या तिघा आरोपींना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून या तिघांचीही अकोला एटीएस कडून चौकशी करण्यात येत आहे बेरोजगारीला कंटाळून बुलढाणा शहरातील शेर- ए -अली चौकातील राहणारे मिर्झा आवेज, शेख साकीब शेख अनवर, उबेद खान शेरखान हे तिघेही काही दिवसापूर्वी अजमेर येथे गेले होते त्या ठिकाणी तिघांपैकी एकाने २५०० रुपयाची नकली एअरगन विकत घेतली व बँक लुटून लुटलेल्या पैशातून एक ऑफिस तयार करून एक कार विकत घेऊन त्या कारमध्ये बुलढाण्यातील श्रीमंत असलेले बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संचालक राधेश्यामजी चांडक व मलकापुराचे माजी आमदार चेंनसुखजी संचेती यांना किडनॅप करण्याचा प्लॅन आखला होता मात्र याची भणक दिल्ली आयबीला लागल्याने या तिघा आरोपींना ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले व त्यानंतर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून या तिघांनंचा अकोला एटीएस कडून चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती प्रल्हाद काटकर पोलीस निरीक्षक बुलढाणा यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post