Hanuman Sena News

भोटा ते कालवड पर्यंत रस्ता दुरुस्ती साठी मलकापूरात मनविसेचे उपोषण सुरु...


रस्त्याअभावी खामगाव आगाराची बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

मलकापुर : नांदुरा तालुक्यातील भोटा ते कालवड पर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी मनविसेचे वतीने अनेकवेळा निवेदने देऊनही संबंधित विभागाने आजपर्यंत निवेदनाची दखल न घेतल्यास २८ सप्टेंबर पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापुर समोर उपोषणास करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज उपविभागीय बांधकाम उपविभाग मलकापुर यांच्या कार्यालयासमोर मनविसेचे उपोषण सुरू करण्यात आले आहे. 
        नांदुरा तालुक्यातील भोटा ते कालवड पर्यंत रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत असुन या रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत,अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी माटरगांव बु, जलंब, खामगांव ला दररोज प्रवास करावा लागतो परंतु रस्त्याअभावी खामगाव आगाराची बस  बंद झाली असुन भोटा पासुन कालवड पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना ठिक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यातून आपला प्रवास करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश खराब तर होतातच शिवाय ३ किलोमीटर प्रवास पायीच करत असल्याने विद्यार्थी बऱ्याचदा उशिरा पोहचतात व त्यांची बस निघून जाते. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी आहेत,तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा मनविसेच्या वतीने देण्यात आला आहे.. 
        यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ मलकापूर मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील,गणेश ठाकूर,मनवीसे तालुका अध्यक्ष गणेश जैस्वाल,शहर अध्यक्ष निखिल पोंदे,दिपक जाधव,गजराज सोळंके,कृष्णा चंदनशिव,प्रेम तायडे,उदय वानखेडे, विनायक पारस्कर, गणेश मानकर, भागवत पारस्कर,वैभव पारस्कर यांचे सह मनविसे तथा मनसे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post