Hanuman Sena News

मा.मंत्री बच्चू कडू यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर...

शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्रीबच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने धक्का दिला होता. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली असून बच्चू कडूंना आता तुरुगांत जावे लागणार, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, या निर्णयानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले. आता, सत्र न्यायालयाने कडू यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे, आमदार महोदयांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले. बच्चू कडू यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, त्यांच्या तुरुंगवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. आमदार बच्चू कडू हे एमपीएससी, परीक्षा मार्फत घेण्यात येणाऱ्या महापोर्टल  बंद करण्यासाठी तत्कालीन, पी, प्रदीप महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक २६ सप्टेंबर २०१८ रोजी मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी पी प्रदीप यांनी, आमदार बच्चू कडू यांच्यासमवेत अरेरावीची भाषा वापरली. तेव्हा, बच्चू कडू यांचा राग अनावर झाला आणि समोरचा लॅपटॉप पी प्रदीप यांच्यावर उगारला. या प्रकरणी प्रदीप यांनी 353 हा गुन्हा बच्चू कडू यांच्यावर दाखल केला होता. याची सुनावणी गिरगाव न्यायालय चालू होती कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे ते स्वत: आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या निषेधाच्या गुन्ह्यात गिरगाव न्यायालयात हजर होते. मात्र, न्यायालयाने आज त्यांचा जामीन फेटाळला असून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. मात्र, त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे त्यावेळी आमदार बच्चू कडू यांचा चेहरा आनंदी दिसला व त्यांनी सांगितले की मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे

Post a Comment

Previous Post Next Post