मलकापूर :- मलकापूर येथील विश्रामगृहात दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन ची बैठक आज दिनांक 18 रविवार दुपारी 1: 00 वाजता संपन्न झाली या बैठकीत दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांगाचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील व दिव्यांग फाउंडेशन चा विस्तार महाराष्ट्रभर कसा विस्तारित करायचा या विविध विषयावर चर्चा करण्यात आली व त्यांच्यामधील असलेले सुप्त सामर्थ विकसित करून त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे या दृष्टीने आपली दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन काम करीत राहील असे दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश भाऊ चोपडे यांनी म्हटले व अशा दिव्यांग बांधवांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हा उद्दिष्ट आहे तसेच दिव्यांग फाउंडेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी श्री पंकज प्रभाकर मोरे ,जिल्हा सचिव पदी श्री शरद वसंतराव खूपसे, सोशल मीडिया प्रमुख रफिक खान यांची नियुक्ती दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक निलेश भाऊ चोपडे व सचिव शेख रईस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या यावेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते
दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन ची बैठक मलकापूर येथे संपन्न...
Hanuman Sena News
0
Post a Comment