सुयोग जी शर्मा
विशेष प्रतिनिधी
मलकापूर :- शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी चे निवेदन मा. मुख्याधिकारी साहेब, नगरपरिषद मलकापूर. यांच्याकडे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मागील काही महीन्यापासून शहरात मोकाट जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे सदर विषयाचा आढावा आपण मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारी वरुन आपल्या लक्षात येईल याचे कारण पाळीव जनावरे त्यांच्या मालकाव्दारे रात्री मोकाट सोडून दिल्यामुळे ते रात्री त्यांच्या आहाराकरीता गावात फिरत असतात आणि काही लोक या गोष्टीचा फायदा घेवून त्यांना मध्यरात्री चोरुन नेतात आणि नंतर तेच मालक सकाळी जनावरे चोरी जाण्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये नों दवतात तसेच मोकाट जनावरामुळे अपघाताचे प्रमाण जास्त प्रमाणत वाढत आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरीकां मध्ये व लहान मुलांन मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.सध्या देशभरात लम्पी रोगाची साथ ही संपूर्ण देशभरात सुरु आहे या साथिच्या प्रादुर्भावने आपल्या गावातील गौवंश ही संक्रर्मित होत आहे. मोकाट फिरत असणाऱ्या गौवंश व्दारे या रोगाचा प्रादुर्भाव एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी संसर्गाचा धोका ही मोठया प्रमाणत निर्माण होत आहे. त्याकरीता या मोकाट जनावरांना आपण कोंडवाडयामध्ये टाकल्यास वरील सर्व अनर्थ टाळण्यास निश्चितच मदत होईल.
लम्पी विषाणुचा प्रादुर्भाव थांब विण्याकरीता तात्काळ सर्व गौवंश यांना लसीकरन करण्यात यावे,डास तसेच माशी द्वारे या संक्रमणाचा प्रादुर्भाव होवू नये याकरीता जनावरांच्या गोठ्या मध्ये फवारणी करण्यात यावी तसेच ज्या गौवंश या रोगाने संक्रमीत झाले आहे त्यांची आयसोलेशनची व्यवस्था करण्यात यावी ही विनंती. असे निवेदनात नमूद केले आहे. प्रतीलीपी मा उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर यांना देण्यात आले.निवेदनावर बजरंग दल तालुका प्रमुख दीपक कपले, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री श्रीकृष्ण तायडे, नगर मंत्री श्यामसिंह हजारी, नगर सहमंत्री राजेश देशपांडे, दीपक चवरे, प्रेम भोपळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत
Post a Comment