बुलढाणा येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतील एसटी बसेसच्या ॲल्युमिनिअमच्या खिडक्या,प्रवासी सिट आणि पायऱ्यांचा पत्रा अज्ञातांनी चोरुन नेला होता. ही घटना १० सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मात्र, हे चोरलेले साहित्य भंगारात विकणाऱ्या एकास तर चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यासही बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून साहित्यही जप्त केले आहे. विभागीय कार्यशाळेत उपयंत्र अभियंता म्हणुन कार्यरत असलेले स्वप्नील कैलास मास्कर(३५) यांच्या तक्रारीनुसार, विभागीय कार्यशाळेत बसेसच्या खराब झालेल्या ॲल्युमिनिअमच्या खिडक्या, प्रवासी सिट्सचा पत्रा, पायऱ्यांचा पत्रा असेे साहित्य ९ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते. हा प्रकार १० सप्टेंबर रोजी उघडकी आल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी विभागीय कार्यशाळेतील सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी बाजारातील भंगाराच्या दुकानात साहित्य विक्रीला आले का? पाहण्यासाठी गेले असता तिथे अक्षय गवारगुरु हा साहित्य विकताना दिसून आला. याचवेळी ही माहिती पोलिसांनी देऊन पोलिसांनी आरोपीस अक्षय गवारगुरु यास अटक केली.चोरीचे साहित्य विकत घेणाराही अटकेत आरोपी अक्षय गवारगुरु यांने चोरीची कबुली दिल्यानंतर हे चोरीचे साहित्य विकत घेणारा मनोज पातालबन्सी याच्यावरही गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.
एसटीचे चोरलेले साहित्य भंगारमध्ये विकणारा अटकेत...
Hanuman Sena News
0
Post a Comment