मलकापूर तालुक्यातील उमाळी व बेलाड ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ची निवड 31 ऑगस्ट रोजी पार पडले यात बेलाड व उमाळी या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सरपंच उपसरपंच निवडून आल्याने दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपाने झेंडा फडकविला आहे उमाळी ग्रामपंचायत येथे सरपंच पदी सरला सोपान भोपले तर उपसरपंच पदी बाबू सिंग गुलाब सिंग चव्हाण या दोघांचाही सहा विरुद्ध पाच मतांनी विजय झाला यांना शेख गुलाम शे.रज्जाक, किशोर अजबराव धोरण, भीमा रामदास गवई, सौ संघमित्रा अनिल इंगळे या चौघांनी सरपंच उपसरपंच पदी मतदान केल्याने ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला, तर बहुचर्चित बेलाड ग्रामपंचायतीच्या झालेल्या सरपंच उपसरपंच निवडणूक सरपंच पदी सचिन संतोष सांभारे तर उपसरपंच पदी सौ प्रतिभा विनोद इंगळे यांची निवड ५ विरुद्ध ४ मतांनी झाली. यांना इच्छाराम दिगंबर संबारे, सौ.मायावती दादाराव इंगळे, सागर निनाजी संबारे या तिघांनी मतदान करून बेलाड ग्रामपंचायतीवर ही भाजपाचा झेंडा फडकवला. माजी आमदार चेनसुखजी संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष सौ उमाताई शिवचंद्र तायडे , भाजपा नेते शिवचंद्र तायडे यांच्या नेतृत्वात बेलाड व उमाळी ग्रामपंचायत व सरपंच उपसरपंच पदी भाजपाचे सदस्य विराजमान झाले असून दोन्ही ग्रामपंचायत वर भाजपाचा झेंडा फडकला आहे यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे यावेळी पाहायला मिळाला
मलकापूर तालुक्यातील उमाळी व बेलाड ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा...
Hanuman Sena News
0
Post a Comment