राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला,' अशा तिखट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मागच्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यांना पालकमंत्री नाही. सत्ताधाऱ्याना सर्वसामान्य जनतेची सेवा करायची नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नेहमीच कुणाच्यातरी घरी दिसतात, असे त्या म्हणाल्या.पुढे त्या म्हणाल्या की, ओरबाडून 50 खोके घेत साम-दाम-दंड-भेद वापरून सरकार सत्तेत आणले. त्यामागे उत्साह फक्त लाल दिव्याच होता. गेल्या अडीच महिन्यात कामे त्या वेगाने चालली नाहीत. त्यांचे दौरे ही फक्त एक किलोमीटरच्या आतमध्ये असतात. पण, महाविकास आघाडी सरकारचे सगळे नेते सकाळी 7 वाजल्यापासून कामे करत होती. तसेच दर शुक्रवारी मॅरेथॉन मिटिंग घ्यायचे.50 खोके ऑल ओके शनिवारीही माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवरही टीकेचे बाण सोडले होते. शिंदे फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंडबाजी ईडीचे सरकार असल्याची खोचक टीका त्यांनी केली होती.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 50 खोके ऑल ओके वाल्या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नव्हती. सध्या सरकारमधील लोक कार्यक्रमांना भेटी देणं सोडतील तर जनतेची सेवा करतील ना… हे एवढे सेलिब्रेशन करण्यात एवढे व्यस्त आहेत की बस्ता बांधला त्यानंतर लग्न केले. मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरु आहे. तसेच 50 खोके ऑल ओके, सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके.
राज्यातील सरकारने 50 खोके घेऊन लाल दिवा मिळवला... सुप्रिया सुळे
Hanuman Sena News
0
Post a Comment