शेगाव येथील आम्रपाली बुद्ध विहारात 11 सप्टेंबर रविवारी सायंकाळी पाच वाजता 101 बुद्ध मूर्तीचे बौद्ध धम्म उपासकांना वितरण होणार आहे या कार्यक्रमाला देश विदेशातील भिक्षू गणांसोबत अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे तसेच अभिनेते गगन मलिक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. शहरात मध्यप्रदेशातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थळाची प्रतिकृती असलेले भव्य बुद्ध विहार आहे या विहाराला असंख्य बौद्ध अनुयायी नियमित भेट देत असतात या विहाराची महंती गगन मलिक फाउंडेशनला कळताच त्यांनी विहाराच्या माध्यमातून 101 बुद्धिमूर्ती वितरित करण्याचा मनोदय व्यक्त केला.त्यानुसार विहार समिती अध्यक्ष रवींद्र शेकोकार व इतर उपासकांनी गगन मलिक प्रतिष्ठानशी सलग पाठपुरावा करून हा उपक्रम घडवून आणला. या कार्यक्रमाला विदेशातील भिक्षुक संघासह जवळपास 25 ते 30 विदेशी बौद्ध उपासक उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाचे ध्वजारोहण भदंत बी संघपाल चैत्यभूमी दादर मुंबई यांच्या हस्ते होईल. तर उद्घाटक ज्येष्ठ भंन्ते मोस्ट व्हेनरेबल थिंक बिन टाॅम मा. गगन मलिक साहेब हे असतील. प्रमुख वक्ते सी एल धुल मा.अध्यक्ष मानवाधिकार आयोग तथा अनु.जाती जमाती आयोग महाराष्ट्र आयोग संबोधी फाउंडेशनचे सिद्धार्थ हत्ती हंबीरे हे करतील प्रमुख अतिथी डॉ.खेमधम्मो महाथेरे प्राचार्य मुळावा ,भिकुणी थीच न्यु नेघम ते लीन पाम,पुक धाहिया,मा नितीन गजभिये, समाजभूषण नितीन शेगोकार,दिनेश शेंडे, डॉ. जयश्री काटकर, बोराडे मुख्याधिकारी शेगाव आदींचे असंख्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शहरातील धम्म उपासकांसह नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
शेगाव नगरीच्या आम्रपाली विहारात 101 बुद्ध मूर्तीचे वितरण...
Hanuman Sena News
0
Post a Comment