Hanuman Sena News

नवऱ्याने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर लिहून दिली हमी ! पण आता झाला दारून पेऊन तो निकामी खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल...

नवरा दारूच्या आहारी गेला की संसाराचा बट्टा बोळ ठरलेला असतो दारुड्या नवऱ्यासोबत राहायला कोणत्या बायकोला आवडेल मात्र तरीही त्या बिचारीने त्याच्यावर विश्वास ठेवला आज सुधारेल उद्या सुधारेल असे तिला वाटत होते. एकदा त्याला कंटाळून ती माहेरी आली मात्र तेव्हा त्याने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर चांगले वागण्याचा आणि वागवण्याचा शब्द दिला. तेव्हा तिने त्याच्यावर विश्वास ठेवला पण शब्द पाडेल तो बेवडा कसला त्याच्यातला राक्षस पुन्हा जागा झाला. आणि त्याने पुन्हा तेच केलं अखेर आता वैतागून तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडित विवाहिता सध्या तिच्या माहेरी शहापूर येथे राहते. 2016 मध्ये तिचे लग्न झाले होते तिला एक चार वर्षाचा आणि एक सव्वा दोन वर्षाचा असे दोन मुले आहेत. लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने नवऱ्याने चांगले वागवले मात्र नंतर दारूच्या नशेत मारहाण करू लागला तरी तिने कसाबसा संसार केला. 2020 मध्ये तिच्या नवऱ्याने मारझोड करून तिला घराबाहेर हाकलले माहेरी येऊन तिने खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र त्यानंतर तिच्या नवऱ्याने सासुरवाडीत येऊन शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर चांगला वागण्याचा व वागविण्याचा शब्द दिला. विवाहिता सासरी नांदायला गेल्यावर तिचा नवरा पुन्हा दारू पिऊ लागला. त्याने तिला दुकानावर उधारित किराणा आणायला पाठवले मात्र आधीची उधारी न दिल्याने ती किराणा आणू शकली नाही.त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलले. या सगळ्या प्रकाराला सासू सासऱ्यांचा पाठिंबा होता. असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह सासू-सासराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .पुढील तपास खामगाव पोलीस स्टेशन करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post