मलकापूर येथील संघटनेच्या कार्यालयात सर्व प्रथम राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेस माल्यार्पण करुन धनश्री ताई काटीकर पाटील महाराष्ट्र अध्यक्ष व नवयुवक मल्हार सेनेचे प्रदेश अध्यक्ष नंदूभाऊ लवंगे यांचे प्रमुख उपस्थितीत
सर्व समाजबांधव तसेच पत्रकार मंडळी कडून अभिवादन करण्यात आले. यावेळी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वकालीन महान राज्यकर्त्या, कुशल प्रशासक होत्या. थोर विचारवंत होत्या. त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते.त्यांचे कार्य, विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत.असे प्रतिपादन यावेळी धनश्रीताई काटीकर पाटील हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केले तसेच मल्हार नवयुवक सेनेचे प्रदेश अध्यक्ष नंदूभाऊ लवंगे यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्याची महती उपस्थित समाजबांधवांना अवगत करत नवयुवक मल्हार सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधवांच्या अडीअडचणी, तसेच त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी नवयुवक मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कार्य करत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच मेंढपाळ बांधवांवर कुठे अन्याय होत असल्यास त्याविरोधात कायदेशीर मार्गाने आंदोलन करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नवयुवक मल्हार सेना सदैव समाज बांधवांच्या पाठीशी उभी राहिल असे वचन उपस्थित समाज बांधवांना दिले.
हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने नवयुवक मल्हार सेनेचे प्रदेश अध्यक्ष नंदूभाऊ लवंगे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षा तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या धनश्री ताई काटीकर पाटील, करणसिंग सिरसवाल, हिंदी मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष उल्हासभाई शेगोकार, संपर्क प्रमुख धर्मेशसिंह राजपूत, सै. ताहेर रासप उपाध्यक्ष ,अनंता दिवनाले इ. पत्रकार मंडळी तसेच दिव्यांग फाउंडेशनचे निलेश चोपडे उपस्थित होते.
Post a Comment