Hanuman Sena News

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आजचा दिवस बैलपोळा...

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. बैलपोळा  या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात.पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. या दिवशी बैलांचे कौतुक केलं जातं. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. आदल्या दिवशी खांदमळणी केली जाते बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते.बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करुन त्यांचे कौतुक करतात.त्याची मिरवणूक काढली जाते. शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य दाखवलं जातं. बैलांसाठी खास ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात बैलपोळा सण प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि महाराष्ट्रात येथील शेतकरी वर्ग साजरा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करण्याची पद्धत आहे तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते. शेतकरी वर्ग या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो आपल्या कृषी संस्कृतीत बैलपोळा सणाचे मोठे महत्त्व आहे शेतीला आधुनिकता प्राप्त होत असतानाही बळीराजांचे बैलांसोबत पूर्वपार चालत आलेले अनोखे नाते कधीही लुप्त होणार नाही शेतकरी व बैल यांच्यातील हा स्नेहांकित बंद असाच कायम राहील सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा

Post a Comment

Previous Post Next Post