मलकापूर भीमनगर येथील अंगणवाडी क्रमांक 29 येथे घेण्यात आलेल्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या 75 वा अमृत महोत्सवानिमित्त महिलांना प्राकृतिक माहिती अध्यक्ष स्थानावरून रजनीताई शेगोकार यांनी दिली
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सतीश दांडगे हे उपस्थित होते तर बाल विकास प्रकल्प अधिकारी बुलढाणा अंतर्गत मलकापूर येथे सुवर्ण महोत्सवानिमित्त भीमनगर येथील अंगणवाडी क्रमांक 29 चया वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम रजनीताई शेगोकार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत मेणबत्ती प्रज्वलित केली .
यावेळी प्राकृतिक स्पर्धा घेऊन
महिलांना विविध प्रकारची माहिती देत 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आहे .
त्यावेळी महिला सोनवणे, सरदार ,इंगळे, अवसरमोल, अबघड, मोरे,रणीत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर अंगणवाडीतील बाल बालिका देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे आयोजन अंगणवाडी शिक्षिका राजकन्या वानखेडे यांनी केले.
Post a Comment