Hanuman Sena News

अवैधरित्या दारु घेवून जाणारा ट्रक पकडला ८ ० ० दारूचे बॉक्स जप्त : चालक अटकेत

 

खामगाव 

पशुखाद्याच्या आड दारु घेवून जाणारा ट्रक मोठया - शिताफीने पाठलाग करुन टेंभूर्णीनजीक पकडण्यात आला असून सदर ट्रकमधून दारुचे तब्बल ८०० बॉक्स यासह ट्रक असा वाहनासह एकूण ७६,२१,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातून एक ट्रक मोठ्या प्रमाणावर दारू घेवून नागपूरकडे जात आहे, अशी गुप्त माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. यावरुन मुंबई भरारी पथकाने बुलडाणा व खामगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेवून संयुक्त पथक तयार केले. या पथकाने काल मध्यरात्री २ वाजेदरम्यान पाठलाग करून ट्रक क्र. सीजी ०७ एव्ही. ४४७६ ला टेंभूर्णानजीक पकडले. यावेळी ट्रकची झाडाझडती घेतली असता मागे गेटवर काही कट्टे पशु खाद्य होते. तर त्यामागे दारुचे बॉक्स लपविण्यात आले होते.



 यावेळी सदर ट्रक जप्त करुन राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात आणण्यात आला. दरम्यान आज सकाळी सदर ट्रकमधील दारुसाठा बाहेर काढण्यात आला असता त्यात तब्बल ८०० बॉक्स दारु मिळून आली. याप्रकरणी ट्रकचालक मोहम्मद हनीफ ५८ वर्षे रा. सादी मदणपूर जि. बांदा उत्तरप्रदेश याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाई एम बी चव्हाण निरीक्षक भरारी पथक मुंबई, ए पी तारू, दुय्यम निरीक्षक भरारी पथक मुंबई, के आर पाटील निरीक्षक उत्पादन शुल्क बुलडाणा, पी एस बोढारे निरीक्षक विभागीय भरारी पथक अमरावती, एन के मावळे निरीक्षक उत्पादन शुल्क खामगाव यांच्यासह आर के पुसे, के • अडळकर, ई आर शेजुळ, एस पी राठोड, निलेश देशमुख, एस आर एडसकर, प्रदिप देशमुख, अमोल सोळंके आदि बहुसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post