मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे यापूर्वी 14 ऑगस्ट 2022 रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे या बैठकीसाठी मुंबईत येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले मिटिंगच्या मृत्यूनंतर ही बैठक रद्द करण्यात आली होती आज पुन्हा या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे आज मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे छत्रपती संभाजी राजे भोसले मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांना या बैठकीस निमंत्रित करण्यात आले आहे या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार बारा संघटना आणि पन्नास मराठा समन्वयकांना बैठकीचा निमंत्रण देण्यात आले आहे मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे याआधी अशोक चव्हाण यांच्या कडे हे अध्यक्ष पद होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित ही बैठक पार पडणार आहे ओबीसी पाठोपाठ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नव्या शिंदे फडवणीस सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे सुरुवातीला नारायण राणे यांच्या नेतृत्वात हा लढा उभारला गेला त्यानंतर भाजपा सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं मात्र हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही त्यानंतर सुप्रीम कोर्टातला संघर्ष सुरू झाला मात्र गेले अनेक वर्ष प्रयत्न करूनही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारला अपयश आला आहे मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघताना दिसत असताना मराठा समाजालाही आरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे
मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज महत्त्वाची बैठक...
Hanuman Sena News
0
Post a Comment