Hanuman Sena News

राज्यपाल नियुक्त आमदाराच्या १२ जागांसाठी रस्सीखेच सुरू...

 भाजपा-शिंदे गटातील ही नावं आघाडीवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागांसाठी भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या १२ जागांपैकी ८ जागा भाजपाला तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच, भाजपा-शिंदे गटातील ही नावं आघाडीवर गेल्या तीन महिन्यांतील नाट्यमय घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारने  पाठवलेली यादी रद्द करून ती नव्याने पाठवण्याची घोषणा केली होती. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागांसाठी भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या १२ जागांपैकी ८ जागा भाजपाला तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. भाजपाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पंकजाताई मुंडे, चित्राताई वाघ, कृपाशंकर सिंह, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांच्या नावाची चर्चा आहे चार जागांसाठी शिंदे गटातील माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ यांची नावं आघाडीवर आहेत या आधीच्या महाविकास आघाडी सरकारने पाठवलेले बारा आमदाराची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेरपर्यंत मंजूर केली नव्हती त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी 12 जागांसाठी नव्याने यादी पाठवण्याचे निश्चित केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post