राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय नाहीत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग संदर्भात बैठक बोलावली होती .या बैठकीत राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय विद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे ही महाविद्यालय उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट कडून चार हजार कोटीचे कर्ज दिले जात आहे. या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल. केंद्र सरकारकडून लवकरच नीती उपलब्ध करून दिल्या जाईल. असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले महाराष्ट्रात बुलढाणा, वाशिम, अमरावती ,गडचिरोली, हिंगोली, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, जालना, मुंबई उपनगर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांच्यासोबत बैठक झाली आहे सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे असे गिरीश महाजनांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारणार...मंत्री गिरीश महाजन..
Hanuman Sena News
0
Post a Comment